अमरावती - मोर्शी रोडवर पेट्रोल टँकरला आग

25 Nov 2025 15:01:02
अमरावती,
tanker-catches-fire-on-amravati-morshi-road नांदगाव पेठ ते माहूली जहागीर रोडवर पेट्रोल टँकरला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. या गीत टँकर पूर्णतः जाळून खाक झाला आहे.
 
 
tanker-catches-fire-on-amravati-morshi-road
 
अमरावतीवरून नांदगाव पेठ, माहूली जहागीरमार्गे तीन पेट्रोल टँकर मोर्शीच्या दिशेने जात होते. मार्गात माहूली गावाजवळ मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे टँकर दुसऱ्या बाजूने जात असताना समोर असलेल्या टँकरचे एक चाक खड्ड्यात गेल्याने टँकर उलटला. काही क्षणातच त्या टँकरला भीषण आग लागली. tanker-catches-fire-on-amravati-morshi-road मागील दोन टँकरच्या चालकांनी प्रसंगावधान राखून टँकर जागेवरच थांबाविले व मागे वाळविले. टँकरला लागलेल्या आगीच्या ज्वालांचे भीषणरूप हादरविणारे होते. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. अग्निशमनदलाने आगीवार नियंत्रण मिळविले.
Powered By Sangraha 9.0