भूखंड मालकी हक्काचे पट्टे व पीआर कार्ड देणार

25 Nov 2025 20:40:31
धारणी, 
devendra-fadnavis : धारणीत भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील चौथमल आणि चिखलदर्‍याचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सोमवंशी यांच्या प्रचारार्थ आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरगच्च सभेत धारणीतील महसूल विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करणार्‍यांना मालकी हक्काचे पट्टे देऊन पी. आर. कार्ड देण्याची घोषणा करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
 
 
 
KL
 
 
 
अमरावती जिल्ह्याच्या प्रचाराचा श्रीगणेशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करताना अतिक्रमण धारकांना पट्ट्े देऊन मालक बनविण्याचे आश्वासन दिले व घरकुलाचा लाभ पण देऊ, तथा पी. आर. कार्ड सुद्धा तयार करून देण्याचे ठोस आश्वासन दिले. धारणीत शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे सुद्धा फडणवीस यांनी आश्वासन दिले. चिखलदरा व धारणी भागात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध विकास योजनांद्वारे विकासकामे करून देण्याचे वचन दिले.
 
 
खा. डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आ. केवलराम काळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, आ. प्रवीण पोटे यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर आ. प्रवीण तायडे, आ. राजेश वानखडे, आ. संजय कुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख सदाशिव खडके, रमेश मावस्कर, रेखा मावस्कर, विवेक नवलाखे, श्याम गंगराडे, गोपू चौथमल, गजू सुडस्कर, बन्सी सेलूकर, सुरपाटणे, डॉ. सुरेंद्र पटेल, राहूल तायडे, जया खंडारे, गजू चांदणे प्रामुख्याने विराजमान होते.
 
 
नवनीत राणा यांनी भाषण देताना मनमर्जीने पक्ष बदलणार्‍यांना धडा शिकविण्याची संधी सोडू नका, असे आवाहन केले. मै मेळघाट की बेटी हुँ, असे सांगताना मेळघाटच्या विकासाबद्दल माहिती देऊन देवाभाऊ नेहमी मेळघाटच्या विकासासाठी प्रयत्नात असतात, असे त्यांनी सांगितले. सभेनंतर नवनीत राणा यांनी धारणीच्या मुख्य मार्गावर रोड शो केला. खुले रंग भवनासमोर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे भाजपा उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0