रेल्वेने नागपूर विभागात राबविली स्वच्छता

25 Nov 2025 20:54:36
नागपूर,
cleanliness-campaign : स्वच्छ भारत, स्वच्छ रेल्वे मोहिमेंतर्गत आग्नेय मध्य रेल्वे, नागपूर विभागात कचरा व्यवस्थापनावर विशेष देखरेख मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग आणि वरिष्ठ यांत्रिक अभियंता निखिलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली. मोहिमेदरम्यान सर्व कचरा विल्हेवाट नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
 

NGP
 
 
 
 
तिकीट निरीक्षक आणि प्रभारी कर्मचार्‍यांना त्यांच्या ड्युटी गाड्यांमध्ये १०-१५ मिनिटे खर्चुन पॅन्ट्री कार व्यवस्थापक आणि ट्रेन स्वच्छता पर्यवेक्षक यांच्याशी समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली. जेणेकरून स्वच्छतेशी संबंधित अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जाईल.
Powered By Sangraha 9.0