सावधान... रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे

25 Nov 2025 18:19:37
गोंदिया,
roads accident जर तुम्ही वाहनाने जिल्ह्यातील रस्त्यांवर प्रवास करण्याचा विचार करत असाल तर सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. जिल्ह्यात असे अनेक अपघात प्रवण स्थळ आहेत जे ‘ब्लॅक स्पॉट्स’ नावाने ओळखले जातात. जिथे रस्ते अपघात नियमितपणे होतात. निष्काळजीपणा, वेग आणि रस्त्यांची दयनिय स्थिती यामुळे वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागते. गत 10 महिन्यांत जिल्ह्यात विविध मार्गांवर 286 अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात 152 जणांनी प्राण गमावले आहे. 138 व्यक्ति गंभीर झाले आहे.
 

accident 
 
जिल्ह्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात ‘ब्लॅक स्पॉट्स’ आणि इतर रस्ते अपघातांमध्ये अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे. कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अपघात घडू नये म्हणून जिल्हा प्रशासन व जिल्हा वाहतुक नियंत्रक विभाग उपाययोजना व सुरक्षिततेसाठी पावले उचलत आहे. जिल्ह्यात 20 ठिकाणे ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून ओळखले जातात. जिथे अपघात टाळण्यासाठी साइनबोर्ड, रिफ्लेक्टर आणि स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत तब्बल 286 अपघात झाले. यात 152 जणांना प्राण गमवावे लागले. 138 गंभीर आणि 59 जण किरकोळ जखमी झालेत.
जानेवारीमध्ये 36 अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. 15 गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले. फेब्रुवारीमध्ये 32 अपघातात 22 जणांचा बळी गेला. 13 गंभीर जखमी, दोघे किरकोळ जखमी झाले. मार्चमध्ये 24 अपघाताच्या घटनांमध्ये 12 मृत्यू, 12 गंभीर व तिघे किरकोळ जखमी झाले. एप्रिलमध्ये 32 अपघात घडले यात 12 मृत्यू, 24 गंभीर आणि 5 किरकोळ जखमी झाले. मे महिन्यात 34 अपघात घडले यामध्ये 17 जणांनी प्राण गमावले. 17 गंभीर आणि 7 किरकोळ जखमी झाले.roads accident जूनमध्ये 25 अपघातात 13 व्यक्तिंचा बळी गेला. 13 गंभीर व तिघे किरकोळ जखमी झाले. जुलैमध्ये 24 अपघातात 14 जण प्राणास मुकले. 9 गंभीर आणि 6 किरकोळ जखमी झाले. ऑगस्टमध्ये 28 अपघातात 13 मृत्यू, 14 गंभीर तर 16 किरकोळ जखमी झाले. सप्टेंबरमध्ये 20 अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. 6 गंभीर व 5 किरकोळ जखमी झाले. ऑक्टोबरमध्ये 31 अपघात झाले ज्यात 18 जणांचा मृत्यू झाला. 15 गंभीर आणि 10 किरकोळ जखमी झाले.

जिल्हा वाहतूक नियंत्रण विभागाने गोंदिया जिल्ह्यात 20 ब्लॅक स्पॉट्स घोषित केले आहेत. जिथे सर्वाधिक अपघात होतात या ठिकाणांचा यात समावेश आहे. यामध्ये कारंजा बसस्थानक, फुलचूर, कटंगी, भागवतटोला, त्रिमूर्ती चौक, बसस्थानक, कोरणी नाका, अदानी पॉवर प्लांटजवळ, बिरसी फाटा, मुंडीकोटा, डव्वा, नैनपूर, चिखली, इटखेडा, साखरटोला, डोंगरगाव, झालिया, पानगाव, धोबीसराड व लोहारा. या स्थळांचा समावेश आहे.

वाहतुकीच्या नियमांचे पालन करून खबरदारी घेतल्यास अपघातावर नियंत्रण मिळविता येते. सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक विभागातर्फे जनजागृी करण्यात येते. वाहन नेहमी नियंत्रणात चालवावे, सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर करावा, अल्पवयीन पाल्यांना पालकांनी वाहन चालविण्यास देऊ नये.
-नागेश भास्कर
पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया
Powered By Sangraha 9.0