कारंजा लाड,
fear of leopards दिघी सोमठाणा परिसरात बिबट्याच्या हालचालींमुळे भीतीचे सावट पसरले आहे. १७ नोव्हेंबर रोजी दिघी येथील दिगंबर कानडे आणि प्रमोद ढळे या दोघांना सोमठाणा घाटात बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेत १ ली ते ८ वीपर्यंत शिक्षण व्यवस्था असल्याने या शाळेत दिघी गावातील अनेक विद्यार्थी दररोज जवळपास ३ कि.मी पायदळ प्रवास करून ये-जा करतात. मात्र, बिबट्या दिसल्याच्या घटनेनंतर या विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेच बंद केले असून, त्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. या गंभीर परिस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा सोमठाणा यांनी २१ नोव्हेंबर रोजी एसटी आगार व्यवस्थापक यांना तातडीचे निवेदन देऊन दिघी सोमठाणा कारंजा या मार्गावर सकाळी १० वाजता आणि सायंकाळी ५ वाजता बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि जनप्रतिनिधी या मागणीच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत.fear of leopards विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी त्वरित एसटी बससेवा सुरू करावी, तसेच वन विभागाने परिसरात पेट्रोलिंग वाढवून नागरिकांचा जीव सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी सर्वत्र होत आहे. बिबट्याच्या धोयाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता कोणती कारवाई करते आणि एसटी बससेवा कितपत लवकर सुरू होते, याकडे संपूर्ण तालुयाचे लक्ष केंद्रित झाले आहे.