ऑटो चालकाचा संशयास्पद मृतदेह

25 Nov 2025 20:12:05
वर्धा,
suspicious-body-of-auto-driver : सेवाग्राम-वर्धा रेल्वे रुळावर बळवंत भानसे (५८) या ऑटो चालकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. त्याचा आकस्मिक मृत्यू की घातपात याबाबतचा तपास वर्धा लोहमार्ग पोलिस करीत आहे.
 
 
BODY
 
बळवंत भानसे नागसेननगरातील देशपांडे ले-आऊट भागातील भीमराव नितनवरे यांच्याकडे भाड्याने राहत होते. नेहमीप्रमाणे ते ऑटो घेऊन बाहेर पडले. परंतु, ते रात्री घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. दरम्यान, सोमवारी त्यांचा मृतदेह रेल्वे रुळालगत असलेल्या नालीमध्ये सापडला. संशयास्पद मृतदेहाची माहिती मिळताच वर्धा लोहमार्ग पोलिस, सेवाग्राम आणि शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी बारकाईने पाहणी केली असता बळवंत भानसे यांच्या डोयावर गंभीर जखमा तर त्याच परिसरात एका दगडावर रतही आढळून आले. या घटनेची नोंद वर्धा लोहमार्ग पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0