election campaign नगरपरिषद निवडणुकीचा अधिकृत प्रचार २६ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटपा नंतर सुरू होत असून, राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. उमेदवारांची धडपड, कार्यकर्त्यांची धावपळ, घराघरात फिरणार्या प्रचाराची धूम आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्षाने ताकदीनिशी रणशिंग फुंकले आहे.
आज पासून शहरात ठिकठिकाणी पक्षांचे झेंडे, बॅनर्स, ओहोळत्या प्रचाररॅल्या, ढोल-ताशांच्या गजरात प्रचारासाठी दाखल होणारे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी अशी दृश्ये पाहायला मिळतील. प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांसोबत विभागनिहाय प्रचाराचे वेळापत्रक आखले असून, घराघरातील भेटींना वेग आला आहे.मतदारांच्या समस्या, विकासाचे आश्वासने, स्थानिक प्रश्न सोडवण्याचे मुद्दे यावर उमेदवारांकडून प्रभावी सादरीकरण केले जात आहे.election campaign काही ठिकाणी एकाच पक्षाच्या गटांमध्ये अंतर्गत स्पर्धा वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.
तर काही विभागांत गुप्त आघाड्या, समझोते आणि रणनीती चर्चांनीही वेग घेतला आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामवर उमेदवारांचे व्हिडिओ, पोस्टर्स, लाईव्ह संवाद, टीका-टिप्पणी आणि प्रतिउत्तरे यामुळे ऑनलाइन युद्धाला या पूर्वीच सुरुवात झाली आहे. विशेषतः तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्ष सोशल मीडिया टीमसह सज्ज झाले आहेत.ता.प्र