गोवंशाची वाहतूक, तिघांना अटक

25 Nov 2025 17:51:37
कुरखेडा,
transporting cattle चारचाकी वाहनातून कत्तल करण्याचा उद्देशाने नऊ गायींची अवैधपणे वाहतूक करणार्‍या चालकासह क्लिनर व खरेदीदाराला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई 23 नोव्हेंबर रोजी भगवानपूर ते शिरपूर दरम्यान मार्गावर करण्यात आली.
 

transporting cattle 
 
 
कुरखेडा पोलिसांनी सापळा रचून 23 रोजी दुपारी मालवाहू जीपमधून (एमएच 40 बीजी- 8002) मध्ये 9 नग गायी पकडल्या. चालक जयंत कांबळे (30), क्लिनर अमित गेडाम (24), दोघेही रा. रावणवाडी, ता. देसाईगंज व खरेदीदार मोहम्मद सोफियान करेशी (27) रा. देसाईगंज यांना अटक करण्यात आली. या कारवाईत 90 हजार रुपये किमतीचे जनावरे व 10 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 10 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.transporting cattle ठाणेदार महेंद्र वाघ, उपनिरीक्षक संदीप ताराम, उपनिरीक्षक दयानंद भोंबे, अंमलदार संदेश भैसारे, कैलाश नेवारे, नरसिंग कोरे आणि प्रकाश साबळे यांनी ही कारवाई केली.
Powered By Sangraha 9.0