वर्धा,
thief-burglary : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिंटू उर्फ चरणसिंग बावरी (२२) रा. शिखबेडा तळेगाव (श्या. पं.) या चोरट्यास अटक करून आर्वी येथील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले.
आर्वी पोलिस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सुरू करण्यात आला. तपासादरम्यान चिंटू उर्फ मुकिंदसिंग बावरी याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने दोन घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी त्याला आर्वी पोलिसांच्या स्वाधीन कऱण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात नरेंद्र पाराशर, सागर भोसले, मिथुन जिचकार, दीपक साठे यांनी केली.