भाजपाच्या एका तर उबाठाच्या दोन उमेदवारांना न्यायालयाकडून दिलासा

25 Nov 2025 19:06:43
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
yavatmal-news : नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज छानणीत अवैध करण्यात आलेल्या भाजपाच्या एका तर उबाठाच्या दोन उमेदवारांना मंगळवार, 25 नोव्हेंबरला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
 
 
y25Nov-Mehata 
 
 
 
निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण समजल्या जाणारी प्रक्रिया म्हणजे उमेदवारी अर्जाची छाननी यात प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रतिस्पर्धी सर्व उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. यांच्या बरोबर प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपाकडून उमेदवारी अर्ज या करणाèया लक्ष्मीबाई रिखबचंद मेहता यांचाही अर्ज अपात्र ठरविण्यात आला होता.
 
 
प्रभाग क्रमांक 2 मधील उबाठा शिवसेनेचे रवींद्र अरगडे व विक्रम अटल या उमेदवारांनी दारव्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने तिन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवत त्यांना पुन्हा निवडणुकीसाठी पात्र घोषित केले आहे. या निर्णयामुळे लक्ष्मीबाई मेहता रवींद्र अरगडे आणि विक्रम अटल यांचा निवडणुकीतील सहभाग निश्चित झाल्याने समर्थकांकडून आनंद व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0