लाल किल्ला स्फोटप्रकरणी एकाला अटक

26 Nov 2025 14:40:04
नवी दिल्ली,
Red Fort blast incident लाल किल्ला स्फोट प्रकरणात एनआयएने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील धौज परिसरातील रहिवासी शोएब अहमद हा सातव्या आरोपी म्हणून या प्रकरणात अटक करण्यात आला आहे. एनआयएच्या माहितीनुसार, शोएबने या स्फोटापूर्वी मुख्य आरोपी दहशतवादी उमर उन नबीला सुरक्षित आश्रय दिला आणि आवश्यक लॉजिस्टिकल सपोर्ट उपलब्ध करून मदत केली.
 
 
red fort blast incident
एनआयएने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, या प्रकरणातील सहा प्रमुख आरोपी आधीच अटकेत आहेत. शोएबच्या अटकेमुळे तपासाची व्याप्ती आता अधिक वाढली आहे. एजन्सीच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, शोएबने उमरला फक्त आश्रय दिला नाही, तर त्याला स्फोटके पोहोचवण्यास, सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यास आणि पळून जाण्यासही मदत केली. त्याचे स्थान आणि कॉल डिटेल्स तपासल्यावर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एनआयएला संशय आहे की शोएबचा संबंध एखाद्या मोठ्या दहशतवादी नेटवर्कशी असू शकतो. शोएबला सध्या दिल्लीत आणण्यात आले असून त्याला विशेष एनआयए न्यायालयात हजर केले जाईल.
Powered By Sangraha 9.0