प्रथमच मतदारांच्या बोटावर लागणार मार्कर पेनची शाई

पारंपरिक शाईला ब्रेक, मतदान प्रक्रिया अधिक कडक

    दिनांक :27-Nov-2025
Total Views |
कारंजा लाड, 
Marker pen ink येत्या २ डिसेंबर रोजी होणार्‍या नगरपरिषद निवडणुकीत मतदारांच्या बोटावर लावण्यात येणारी पारंपरिक शाई यंदा वापरली जाणार नाही. तर त्या जागी प्रथमच विशिष्ट प्रकारच्या मार्कर पेनची गडद आणि टिकाऊ शाई वापरण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये हा पहिलाच प्रयोग असल्याने मतदारांमध्ये याची चर्चा रंगत आहे. या निवडणुकीत नगरपरिषद क्षेत्रातील ३१ नगरसेवक पदे आणि एक नगराध्यक्ष पद यासाठी मतदान होणार असून, ओळख पटविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या शाईच्या पद्धतीत या वेळी महत्वाचा बदल करण्यात आला आहे.
 
 
 
Marker pen ink
 
प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार मार्कर पेनची शाई अत्यंत गडद आणि घट्ट असल्याने मतदार दुबार मतदान करू शकत नाहीत. पारंपरिक ब्रशने लावल्या जाणार्‍या शाईच्या तुलनेत ही पद्धत जास्त प्रभावी, अचूक व त्रुटीविरहित आहे. याआधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही या विशेष पेनचा वापर करून सकारात्मक अनुभव मिळाल्याने, नगरपरिषद निवडणुकीतही ही पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.मत दान प्रकरणात होणारा कोणताही गोंधळ, शाई पुसण्याचा प्रयत्न किंवा दुबार मतदानाच्या शयता पूर्णपणे संपवण्यासाठी मार्कर पेनचा वापर हा प्रशासनाचा अभिनव आणि काटेकोर उपक्रम मानला जात आहे.यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत पहिल्यांदाच मतदारांच्या बोटावर मार्कर पेनची शाई उमटणार असून, मतदान प्रक्रियेतील हा बदल मोठे आकर्षण ठरत आहे.