मुलगी झाल्याने मुस्कान रस्तोगीला तुरुंगात मिळाले नवजीव

    दिनांक :27-Nov-2025
Total Views |
मेरठ,
Muskan Rastogi jailed मेरठमधील ब्लू ड्रम हत्याकांडातील आरोपी आणि दिवंगत सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी काही दिवसांपूर्वी आई बनली असून मुलीच्या जन्मानंतर तिच्या तुरुंगातील परिस्थितीत बदल झाले आहेत. प्रसूतीनंतर रुग्णालयातून परतल्यावर तिला मेरठ केंद्रीय कारागृहातील बॅरेक क्रमांक १२ अ मध्ये हलवण्यात आले आहे. या बॅरेकमध्ये आधीच इतर महिला कैदी त्यांच्या लहान मुलांसह राहतात. सध्या मुस्कान आणि तिची नवजात मुलगी दोघीही निरोगी असून, तुरुंग वैद्यकीय पथक त्यांची नियमित तपासणी करत आहे. बाळाला तुरुंगातच लसीकरण दिले जाणार असून पुढील प्रक्रिया देखील याच ठिकाणी पूर्ण केली जाईल.
 
 

muskan 
 
तुरुंग प्रशासनानुसार मुस्कानला पौष्टिक आहार, आरामदायी वातावरण आणि विशेष लक्ष दिले जात आहे. प्रसूतीनंतर तिला कोणतेही काम देण्यात आलेले नाही, मात्र एक महिना पूर्ण झाल्यावर तिच्यावर हलक्या स्वरूपाचे काम सोपवण्याची तयारी आहे. नवजात बालकाच्या संगोपनासाठी पाळणाघर, अंगणवाडी नोंदणी आणि आवश्यक वस्तूंची उपलब्धता कारागृहातूनच करण्यात येणार आहे. डीएनए तपासणीसंदर्भात मात्र अद्याप कोणत्याही पक्षाकडून औपचारिक विनंती आलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.