अध्यक्षपदासाठी अपक्ष आणि सदस्यपदासाठी राष्ट्रवादीची उमेदवारी

27 Nov 2025 20:52:06
तभा वृत्तसेवा
पुसद, 
pusad-candidate : नगर परिषद पुसदचे माजी पाणीपुरवठा सभापती राजू नत्थूजी दुधे यांनी अनेक दिवसांपूर्वी नप अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचे शहरात बॅनर्स लावून जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अप) तर्फे हमखास उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या राजू दुधे यांना नाईक पिता-पुत्रांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी देण्याचे कबूल केले. मात्र अखेरच्या क्षणी घरातील उमेदवार दिला. त्यामुळे नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी अध्यक्षपदासह सदस्यपदाचा अपक्ष अर्ज भरला होता.
 
 
y27Nov-Raju-Dudhe
 
राष्ट्रवादी (अप) पक्षाने सदस्य पदाच्या अर्जासोबत अंधारात ठेऊन एबी फॉर्म जोडून निवडणुक निर्णय अधिकारी यांना सोपविला. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी (अप) च्या नगरसेवक पदाचा अर्ज परत घेण्यासाठी गेलो असता तसे केल्यास निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वॉर्डाच्या निवडणूक प्रक्रियेतूनच बाद होणार, असे निवडणूक निर्णय अधिकाèयांनी सांगितले. त्यामुळे प्रभागातील राष्ट्रवादीची उमेदवारी कायम राहिली असून न. प. अध्यक्ष पदासाठीदेखील आपली अपक्ष उमेदवारी कायम असल्याचे राजू दुधे यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0