Video आक्षेपार्ह दावा; तिला मुस्लिम बनविणार.. मग

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओने उडवला वाद

    दिनांक :28-Nov-2025
Total Views |
पाकिस्तान,
Aishwarya Rai Bachchan, बॉलिवूडची जागतिक स्तरावर ओळखली जाणारी सुपरस्टार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसंबंधी पाकिस्तानातून चर्चेचा विषय ठरलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानातील एका मौलानाने (मुफ्ती कवी) ऐश्वर्या रायशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत तिच्यावर आश्चर्यकारक आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.
 
 

Aishwarya Rai Bachchan, 
व्हायरल झालेल्या Aishwarya Rai Bachchan, पॉडकास्टमध्ये मौलानानं दावा केला आहे की, ऐश्वर्या राय आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांच्यातील नातं काही काळापासून बिघडले आहे. त्यानुसार, जर या जोडप्याचा संबंध तुटला, तर पुढील दोन ते चार महिन्यांत ऐश्वर्या राय स्वतः मौलानाला लग्नाचा प्रस्ताव पाठवू शकते. मौलानानं यावर अधिक भर देताना सांगितले की, तो ऐश्वर्याला सर्वप्रथम इस्लाम धर्म स्वीकारायला सांगेल आणि नंतरच निकाह करेल.यासोबतच मौलानानं ऐश्वर्या रायसाठी आधीच मुस्लिम नाव निवडलं असल्याचंही सांगितलं. त्यानुसार, ऐश्वर्याचं नाव बदलून 'आयेशा राय' केले जाईल. मौलानाच्या या विधानानं सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया निर्माण झाल्या आहेत, काहींनी हे हास्यास्पद समजले तर काहींनी गंभीर आक्षेप घेतला.
 
 
 
 
सौजन्य : सोशल मीडिया  
 
हा मौलाना Aishwarya Rai Bachchan, पूर्वीही अशाच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत राहिला आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला त्याने भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल राखी सावंतसह लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळीही त्याने राखी सावंतसाठी लग्नाची तारीख १४ फेब्रुवारी जाहीर केली होती, परंतु राखी सावंतने हा प्रस्ताव उघडपणे नाकारला होता.अशा वक्तव्यांमुळे फक्त अभिनेत्रीच्या प्रतिमेला नव्हे, तर समाजातील संवेदनशीलतेलाही धक्का बसतो. ऐश्वर्या राय या जगभरातील चाहत्यांमध्ये अत्यंत आदरणीय असलेल्या अभिनेत्री आहेत आणि तिच्यावर अशा प्रकारच्या आक्षेपार्ह विधानांनी अनेकांना नाराज केले आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही वाद निर्माण केला असून, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यावर अनावश्यक चर्चेला चालना दिली आहे. या घटनेनंतर चाहत्यांनीही मौलानाच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.