नवी दिल्ली,
Government holiday schedule for 2026 केंद्र सरकारने 2026 साठीचे अधिकृत सुट्टी दिनदर्शक जाहीर केले असून यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पुढील वर्षाचे नियोजन अधिक सुलभ होणार आहे. देशभरातील सर्व केंद्रीय कार्यालयांना लागू होणाऱ्या सुट्ट्यांचे वेळापत्रक ठरवण्यात आले असून कोणत्या दिवशी बंधनकारक सुट्टी असेल आणि कोणत्या सुट्ट्या पर्यायी असतील याचे स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, दिल्लीच्या बाहेरील कार्यालयांना स्थानिक परंपरा व गरजेनुसार तीन पर्यायी सुट्ट्या निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना प्रतिबंधित रजा यादीतून दोन सुट्ट्या स्वतः निवडण्याची सुविधा असेल. त्यामुळे 2026 मधील सरकारी सुट्ट्यांचे स्वरूप अधिक लवचिक आणि व्यवस्थीत राहणार आहे.
गणतंत्रदिवस, स्वातंत्र्यदिवस, महात्मा गांधी जयंती, दिवाळी, दसरा, ईद, गुड फ्रायडे, ख्रिसमससह देशभर पाळल्या जाणाऱ्या अनेक प्रमुख उत्सवांना बंधनकारक सुट्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. तर होळी, जन्माष्टमी, राम नवमी, गणेश चतुर्थी, मकरसंक्रांत, पोंगल, ओणम, पोंगल, करवा चौथ, छठ पूजा यांसारख्या विविध सणांना पर्यायी सुट्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे. याशिवाय रिस्ट्रिक्टेड लीव्ह मध्ये नववर्ष, हजरत अली जयंतीपासून ते महर्षी वाल्मीकि जयंती, रथयात्रा, भाईदूज, ओणम, राखी, गणेशोत्सव ते ख्रिसमस ईव्हपर्यंत विस्तृत पर्याय उपलब्ध आहेत. सरकारच्या या दिनदर्शिकेमुळे कर्मचाऱ्यांना सण, कौटुंबिक कार्यक्रम आणि वैयक्तिक कामांसाठी वेळेचे नियोजन अधिक सहजपणे करता येणार असून नवीन वर्षी सुट्यांचे व्यवस्थापन पूर्वीपेक्षा अधिक सुटसुटीत राहणार आहे.