ब्लॉकबस्टर ‘कांतारा : चॅप्टर 1’ डिजिटल रिलीज

28 Nov 2025 11:40:08
मुंबई,
Kantara Chapter 1 2025 वर्षाने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांची चढउतार पाहिली असली, तरी ‘कांतारा : चॅप्टर 1’ ने त्यातली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘छावा’, ‘सैयारा’, ‘सितारे जमीन पर’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांसह दाक्षिणात्य पॅन इंडिया चित्रपटांनीही वर्षभर गाजत राहिले. मात्र ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा : चॅप्टर 1’ ला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. थिएटर्समध्ये भव्य यशस्वी धाव घेतल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे.
 

Kantara Chapter 1 
ऋषभ शेट्टी लिखित, Kantara Chapter 1 दिग्दर्शित आणि अभिनीत हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2025 पासून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम आवृत्त्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मात्र हिंदी आवृत्तीची चाहत्यांनी आतुरतेने वाट पाहत असतानाच अखेर तीही प्राइम व्हिडिओवर रिलीज करण्यात आली आहे. ऋषभ शेट्टीसोबत गुलशन देवैया आणि रुक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मोठ्या प्रमाणावर पाहिला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.‘कांतारा : चॅप्टर 1’ हा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘कांतारा’चा प्रीक्वेल असून पंर्जुली देवाच्या उत्पत्तीची कथा यात उलगडली आहे. जंगलांचे रक्षण करणाऱ्या दैवी शक्ती, मानवाच्या लोभामुळे निर्माण होणारे संघर्ष आणि त्यातून उभा राहणारा दैवी कोप याभोवती ही कथा फिरते. पंर्जुली देवता रक्षण तर गुलिगा देवता न्याय देत असल्याचे चित्रपटात प्रभावीपणे मांडले गेले आहे. कर्नाटकातील पारंपरिक भूत कोला परंपरेचे दिग्दर्शन, अभिनय आणि दृश्यसजावट प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारीच ठरली आहे.दसऱ्याच्या मुहूर्तावर 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवत पुढे गेला. सॅकनिल्कच्या अंदाजानुसार, केवळ 43 दिवसांत भारतात 738.40 कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने प्रेक्षकांचे जबरदस्त प्रेम मिळवले. तर 111 कोटी रुपयांची कमाई परदेशात नोंदवून हा सिनेमा वर्षातील सर्वाधिक यशस्वी पॅन इंडिया चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
 
 
ओटीटीवर Kantara Chapter 1 प्रदर्शित झाल्यानंतर थिएटरमध्ये हा अनुभव चुकवलेले प्रेक्षक, तसेच मोठ्या पडद्यावरील जादू पुन्हा एकदा अनुभवू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कांतारा : चॅप्टर 1’मोठी मेजवानी ठरणार आहे. सशक्त कथानक, दमदार अभिनय आणि दैवी परंपरांचे गूढ दर्शन एकत्र अनुभवू इच्छिणाऱ्यांसाठी हा चित्रपट आता अगदी घरबसल्या उपलब्ध आहे.
Powered By Sangraha 9.0