मुंबई,
Kiara-Siddharth girl name अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी अखेर त्यांच्या मुलीचे नाव जाहीर केले आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांना तिच्या नावाबद्दल माहिती दिली. कियारा आणि सिद्धार्थ यांची मुलगी यावेळी जुलै महिन्यात जन्मली असून, तिचे नाव ‘सराय्या मल्होत्रा’ ठेवण्यात आले आहे.
पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘आमच्या प्रार्थनेपासून आमच्या बाहूपर्यंत, दैवी आशीर्वादांपासून आमच्या राजकुमारीपर्यंत…’ सराय्या हिब्रू शब्द ‘साराह’ पासून प्रेरित असून त्याचा अर्थ राजकुमारी होतो. मुलीच्या जन्मानंतर कियारा आणि सिद्धार्थचे आयुष्य पूर्णपणे बदलले असून, त्यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे.