मुंबई,
Pooja Bedi बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहतात. लग्नानंतर कुटुंबाला प्राधान्य देत करिअरला विराम देणाऱ्या काही अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री पूजा बेदीचे नावही घेतले जाते. परंतु कुटुंबासाठी अभिनय सोडणाऱ्या पूजाला वैवाहिक आयुष्यात मात्र मोठ्या धक्क्यांना सामोरं जावं लागलं, असे तिने एका अलीकडील मुलाखतीत सांगितले.
पूजा बेदीने १९९४ मध्ये Pooja Bedi फरहान फर्निचरवाला याच्यासोबत विवाह केला. रूढीवादी मुस्लिम कुटुंबातून आलेल्या फरहानसोबत लग्नानंतर तिने अभिनय क्षेत्राचा पूर्णपणे त्याग केला. “मला प्रत्येक गोष्टीत १०० टक्के द्यायचे होते. पण फरहानच्या कुटुंबातील सून ‘सेक्सी अभिनेत्री’ असू शकत नाही, अशी धारणा होती. दोन्ही कुटुंबीयांनीही आमच्या लग्नाला विरोध केला होता. वाद टाळण्यासाठी मी बॉलिवूड सोडले,” असे पूजा मुलाखतीत सांगते.लग्नानंतर तिने मुलगा आणि मुलीला जन्म दिला. मात्र, काही वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि २००३ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. “दोन मुलांचा सांभाळ माझ्या खांद्यावर आला. पण घटस्फोटाच्या काळात माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी प्रसंग एकामागोमाग एक घडत होते,” असे पूजा म्हणाली.
आपल्या भावनिक संघर्षाबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, “मी २७ वर्षांची असताना माझ्या आजीचे कॅन्सरने निधन झाले. त्याच काळात माझ्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला. माझी आई भूस्खलनात मरण पावली आणि माझ्या भावाने आत्महत्या केली. हे सर्व घडत असताना माझा घटस्फोटही झाला. त्यावेळी मी फक्त ३२ वर्षांची होते आणि प्रत्येक सहा महिन्यांनी काहीतरी भयंकर घडत होतं.”या संकटातून बाहेर पडण्यासाठी पूजाने लेखनाचा मार्ग निवडला. “मी कॉलम लिहायला सुरुवात केली आणि हळूहळू आयुष्यातल्या गोष्टी सुधारू लागल्या,” असे ती सांगते.
फरहानसोबतचा Pooja Bedi संबंध कडवट न राहिल्याचा उल्लेख करताना पूजा म्हणाली, “घटस्फोटानंतरही आमच्यात कुठलाच राग नव्हता. एका वर्षाच्या आत मी त्याच्यासोबत मर्सिडीजमध्ये प्रवास करत होते. त्याचा व्यवसाय उभारण्यात मी सुरुवातीपासून मदत केली, पण त्यातून मला काहीही मिळालं नाही. ते स्वीकारणं माझ्यासाठी कठीण होतं, पण मला परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागलं.”कुटुंबासाठी करिअरचा त्याग करून वैयक्तिक जीवनात संघर्षांचा सामना केलेल्या पूजाची ही कथा अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. तिचा जीवनप्रवास आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.