‘मराठी भाषा आणि मुंबईचा आत्मा जपणं प्रत्येकाचं कर्तव्य

28 Nov 2025 12:01:37
मुंबई,
Suniel Shetty, बॉलिवूडमधील फिटनेस आयकॉन आणि बहुआयामी अभिनेता सुनील शेट्टी यांनी मुंबईत मराठी भाषेवरून होणारे राजकारण आणि सक्तीच्या नावाखाली होणारा हिंसाचार हा चुकीचा असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
 

Suniel Shetty, Marathi language, Mumbai culture 
मुंबईत राहणाऱ्यांनी Suniel Shetty मराठी भाषा शिकणं आवश्यक असल्याचं सांगताना सुनील शेट्टी म्हणाले की, “मुंबईत राहत असाल, तर मराठी येणं गरजेचं आहे. भाषा म्हणजे संस्कृतीचा आत्मा आहे, आणि तिचा आदर करणं हे नागरिकत्वाचं भान आहे. पण यावरून होणारं राजकारण आणि हिंसाचार मला अजिबात पटत नाही. विभाच्या निधनाचा उल्लेख करताना ते भावूक होत म्हणाले की, “विभाचं जाणं म्हणजे वैयक्तिक नुकसान आहे. ती नेहमीच बातम्या आमच्या दृष्टीकोनातून, प्रामाणिकपणे मांडायची. म्हणूनच एबीपी माझाशी माझा भावनिक संबंध आहे.”
 
 
 
फिटनेसविषयी Suniel Shetty बोलताना सुनील शेट्टी यांनी आपल्या शिस्तबद्ध जीवनशैलीची सूत्रं उलगडली. ते म्हणाले, “फिटनेस म्हणजे माझ्यासाठी नियमितपणा. लहानपणापासून खेळ, मार्शल आर्ट्स यांची आवड होती. सात-आठ तासांची झोप, रोजचा व्यायाम, आणि स्वतःवर नियंत्रण – या सगळ्यामुळे मी आजही तंदुरुस्त आहे. मला कोणाशी स्पर्धा नाही, मला फक्त स्वतःला सुधारत राहायचं आहे.”बॉलिवूड आणि राजकीय पार्ट्यांपासून दूर राहण्याचा आपला निर्णयही त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडला. “मी आजही फिल्म पार्ट्या आणि पॉलिटिकल पार्ट्यांपासून दूर असतो. काही राजकीय नेते आदर्श असले तरी मी माझी मर्यादा जाणून वागतो. पाकिस्तानबद्दल माझा राग आहे, पण मी कधीच सीमारेषा ओलांडत नाही,” असे ते म्हणाले.अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्याबद्दलच्या आपल्या जिव्हाळ्याच्या भावना व्यक्त करताना सुनील शेट्टी म्हणाले, “दादा माझे हिरो होते आणि आजही आहेत. त्यांनीच माझ्यातल्या गुणांना ओळखून मला चित्रपटात यायला प्रोत्साहन दिलं. आमचं नातं आजही तसंच आहे—खूप आपुलकीचं.”महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या मैत्रीचा उल्लेख करताना त्यांनी त्यांच्या संवेदनशील नात्याची स्तुतिसुमने उधळली. “जेमिमाने स्मृतीसाठी घेतलेला निर्णय हा फक्त मैत्री नाही, तो खरा भाईचारा आहे. अशा नात्यांमुळेच भारतीय संघ विश्वचषक जिंकू शकला,”असे ते म्हणाले.
 
 
 
लग्न करूनच Suniel Shetty फिल्म करियर सुरू करण्याच्या निर्णयाविषयी स्पष्ट करताना सुनील शेट्टी म्हणाले, “माझ्या पार्टनरला कधीही इनसिक्योरिटी वाटू नये, हा माझा निर्णय होता. सेलिब्रिटींच्या कुटुंबात असुरक्षितता असतेच. पण मला माझ्या नात्याला प्राधान्य द्यायचं होतं. बॉक्स ऑफिसवर परिणाम फक्त काँटेन्टचा होत असतो, लग्नाचा नाही.”शून्यातून हिंदी फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या सुनील शेट्टीचा प्रवास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी मानला जातो. तब्बल 100 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून त्यांनी स्वतःला गुणी अभिनेता, निर्माता आणि व्यवसायिक म्हणून सिद्ध केलं आहे. नव्वदच्या दशकातील अॅक्शन आणि त्यांचा भारदस्त आवाज यामुळे त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं.
Powered By Sangraha 9.0