छोट्या पडद्यावरून बॉलिवूडपर्यंतचा सफल प्रवास!

    दिनांक :28-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Yami Gautam हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकांमधून केली आहे. त्यातच छोट्या पडद्यावरून बॉलिवूडमध्ये दमदार पाऊल ठेवणाऱ्या अभिनेत्रींची यादी घेतली, तर यामी गौतम हे नाव अग्रस्थानी येतं. गेल्या बारा वर्षांत तिने स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवत प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले आहे.
 

Yami Gautam 
हिमाचल Yami Gautam  प्रदेशातील बिलासपूर येथे २८ नोव्हेंबर १९८८ रोजी जन्मलेल्या यामीने केवळ आपल्या सौंदर्यामुळे नव्हे, तर अभिनयाच्या खोलीमुळेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. अभिनयातील तिची सुरुवात २००८ साली ‘चांद के पार चलो’ या टीव्ही मालिकेतून झाली. या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारत छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख तयार केली. त्यानंतर ती ‘ये प्यार ना होगा कम’ या मालिकेत झळकली आणि या मालिकेनेही प्रेक्षकांची पसंती मिळवली.
 
 
 
यामीने Yami Gautam  चित्रपटसृष्टीतील पदार्पण दक्षिणेकडील सिनेमांमधून केले. काही वर्षांच्या मेहनतीनंतर तिला बॉलिवूडमध्ये मोठी संधी मिळाली आणि २०१२ साली आलेल्या ‘विकी डोनर’ मधून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आयुष्मान खुरानासोबत केलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आणि यामीला बॉलिवूडमध्ये नवे स्थान मिळवून दिले.यानंतर आलेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने तिच्या कारकिर्दीला नवे वळण दिले. सुमारे ४२ कोटींच्या बजेटवर उभा राहिलेला हा चित्रपट तब्बल ३४० कोटींची कमाई करत ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. सध्या तिचा ‘हक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेत असून यामधील तिच्या अभिनयाचाही गौरव होत आहे.उरीच्या यशानंतर यामीच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठा बदल झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे आदित्य धर आणि यामी यांच्या मैत्रीने प्रेमाचा आकार घेतला आणि दोघांनी २०२१ साली लग्न केले. काही महिन्यांपूर्वीच या जोडप्याने त्यांच्या मुलगा वेदविदचे जगभर स्वागत केले असून दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.
 
यामी गौतम आज केवळ यशस्वी अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर स्वतःची मेहनत, सातत्य आणि साधेपणाने ओळखली जाते. तिची संपत्ती अंदाजे ४० कोटी रुपयांच्या आसपास असून प्रत्येक चित्रपटासाठी ती कोट्यवधींची मानधन आकारते. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा तिचा प्रवास अनेक तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे.