आरोग्य विभागात अधिकारी, कर्मचार्‍यांची २५१ पदे रिक्त

03 Nov 2025 20:50:28
गोंदिया,
health department vacant जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवा दिली जाते. यासाठी आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती करून इमारती उभारण्यात आल्या आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील आरेग्य केंद्रांमध्ये अपेषित मनुष्यबळ असणे अपेक्षित आहे. मात्र, या विभागात अधिकारी आणि कर्मचार्यांची तब्बल २५१ पदे रिक्त आहेत. त्याचा ताण आरोग्य सेवेवर पडत आहे. असे असताना देखील इच्छाशक्ती आणि नियोजनाच्या बळावर केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रमांत जिल्हा आरोग्य विभाग भरारी घेत आहे.गोंदिया जिल्हा आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा दिली जाते. जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २६३ आरोग्य उपकेंद्रे, २६ आयुर्वेदिक दवाखाने, ३ आग्ल दवाखाने आणि ४ फिरते दवाखाने कार्यरत आहेत.
 
 
 
aarogya vibhag
 
 
 
या दवाखान्यांमध्ये मंजूर आकृतिबंधानुसार अधिकारी, कर्मचार्यांची पदस्थापना होणे अपेक्षित आहे. मात्र अपुर्या मनुष्यबळाशी आरोग्य यंत्रणा झुंजत आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि इतर केंद्रांसह जिल्ह्यासाठी अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी ९३८ पदे मंजूर आहेत. पैकी २५१ पदे रिक्त आहेत. सध्या जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा संसर्गजन्य रोग अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. तर जिल्हा माता आणि बाल संगोपन अधिकारी हे पद अद्याप मंजूर नाही. मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ८ तालुका आरोग्य अधिकारी आणि ८ वैद्यकीय अधिकारी श्रेणी ‘अ’ च्या रिक्त पदांबाबत सरकारला माहिती देण्यात आली आहे. लवकरच या पदांवर नियुक्त्या होतील, असे सांगीतले जात आहे. यापैकी काही पदी पदोन्नती व काही सरळ सेवने भरण्यात येणार असल्याचे सांगीतले जाते. ज्यामुळे आरोग्य सेवा सहज आणि सुलभपणे उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. उल्लेखनिय म्हणजे आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असताना जिल्हा विविध उपक्रमात अग्रणी असल्याचे अवहवालावरून दिसून येते. चौकट..जिल्ह्यात ७२ ‘अ’ वर्गाची पदे मंजूर आहेत. ती सर्व भरली आहेत. एकूण ५६ वैद्यकीय अधिकारी श्रेणी २ ची पदे मंजूर आहेत. त्यापैकी २९ नियमित अधिकार्यांनी आणि २२ कंत्राटी अधिकार्यांनी भरली आहेत. तर ५ पदे रिक्त आहेत. औषध निर्माण अधिकार्यांच्या ४४ जागांपैकी १ जागा रिक्त आहे.health department vacant महिला आरोग्य सहाय्यकांची ४० पदे मंजूर असून २९ पदे भरली आहेत, ११ पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवेचा कणा मानले जाणारे आरोग्य सहाय्यक (एएनएम) यांची ३६६ पदे मंजूर आहेत. पैकी १५१ पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवकाची ५३ पदे, स्वच्छकाची १६ पदे रिक्त आहेत. रुग्णवाहिकेवरील वाहनचालक हे कंत्राटी नेमले गेले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0