आर्वी ग्रामीण मंडळात भाजपाची रणनिती बैठक

03 Nov 2025 19:14:41
आर्वी,
meeting in arvi rural जिल्हा परिषद वाठोडा सर्कलच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या आर्वी ग्रामीण मंडळाची बैठक पार पडली. पंचायत समिती वाठोडा आणि देऊरवाडा सर्कलसाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थान प्रदेश कार्यकारणीचे राजू गोंडसे होते. या बैठकीत दोन्ही सर्कलचे बूथ प्रमुख, शती केंद्र प्रमुख, प्रमुख पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख वक्ते आणि भाजप वर्धा जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रशांत वानखेडे, आर्वी ग्रामीण प्रभारी प्रशांत ठाकूर, सर्कल प्रमुख अश्विन शेंडे, ज्येष्ठ नेते अरुण गेडाम, शेषराव सत्रे, राजू कदम, शिरीष देशमुख, धर्मा तेलमोरे, माजी पंचायत समिती सदस्य धर्मेंद्र राऊत, अशोक तुमडाम, तालुका महामंत्री बाळा सोनटक्के, आणि मंडळ अध्यक्ष राजू ठाकरे यांची उपस्थिती होती.
 
 

bjp startagy  
 
 
 
प्रशांत वानखेडे यांनी वाठोडा सर्कल वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि बहुचर्चित सर्कल आहे. आमदार सुमित वानखेडे यांनी सुरू केलेली विकास कामांची मालिका येथे अबाधित ठेवण्यासाठी पक्षाने निश्चित केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांचे हात बळकट करावे. वाठोडा सर्कलमध्ये भाजपच आघाडीवर राहील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. भाजपमध्ये कार्यकर्ताच श्रेष्ठ आहे. होऊ घातलेली ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. दावेदारी अनेकांची असली तरी, कमळ हेच आपले उमेदवार आहेत, असे त्यांनी सांगितले.meeting in arvi rural राजू गोंडसे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. राजू ठाकरे यांनी विरोधकांचे फेक नरेटिव्ह खोडून काढून केंद्र आणि राज्य सरकारच्या जनपयोगी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. बाळा सोनटक्के आणि धर्मेद्र राऊत यांनीही मार्गदर्शन केले.
संचालन व आभार प्रदर्शन चांभारे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0