सीएनजी कारने घेतला पेट, कुटुंबाचा थरारक अनुभव!

03 Nov 2025 18:28:14
समुद्रपूर, 
cng car fire तालुक्यातील वर्धा मार्गावरील शेडगाव-मांडगाव रस्त्यावर धावत्या सीएनजी कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने कारमध्ये प्रवास करणार्‍या कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित बचावले असून वाहन पूर्णतः जळून खाक झाले. ही घटना आज सोमवार ३ रोजी सकाळी घडली.
 

कार fire  
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील अशोक वनकर (६७), पत्नी नीलिमा (५०) हे एम. एच. २९ बी. डब्ल्यू. ६१०९ क्रमांकाच्या मारुती अर्टीका कारमध्ये जाम येथे सीएनजी भरल्यानंतर वर्धेकडे जात होते. सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेडगाव-मांडगाव मार्गावर धावत्या कारच्या इंजिनमधून धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कार थांबवून सर्वांना खाली उतरवले. काही क्षणांतच कारने पेट घेतला आणि पाहता पाहता कार जळून राख झाली. नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.cng car fire अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत वाहन पूर्णतः जळून गेले होते. वाहनामध्ये महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईल सुद्धा जळून खाक झाली. घटनास्थळी काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. जाम महामार्ग पोलिसांनी दुर्घटनाग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0