सीसीटीव्हीत कैद झाला जीवघेणा क्षण — मोबाईलमध्ये गुंतला आणि…

03 Nov 2025 16:57:33
नवी दिल्ली,
Deadly moment captured on CCTV मोबाईल फोनचं व्यसन आजघडीला समाजासाठी एक गंभीर संकट बनत चाललं आहे. दिवसाची सुरुवात असो वा शेवट, लोकांच्या हातात मोबाईल कायम चिकटलेले दिसतात. सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या या पिढीचं वास्तव आता धोक्याच्या टप्प्यावर पोहोचलं आहे. याचाच पुरावा देणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये गुंतलेला एक माणूस स्वतःच्या जीवाशी खेळ करताना दिसतो.
 
 

Deadly moment captured on CCTV 
हा व्हिडिओ एका कारखान्यातील आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमध्ये एक व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये इतका मग्न दिसतो की, त्याचं लक्ष सभोवतालच्या धोका लक्षात घेण्याकडेही जात नाही. तो ट्रॉली ओढत असतो, हातात फोन असतो, आणि पूर्ण लक्ष मोबाईल स्क्रीनवर. एका क्षणी तो ट्रॉली सोडतो, समोरचा लोखंडी दरवाजा उघडतो, तरीही नजर फोनवरून हटत नाही. पुढच्याच क्षणी तो मोबाईल वापरत वापरत पुढे सरकतो आणि खाली असलेल्या खोल खड्ड्यात थेट पडतो.
 
 
 
 
घटनेचा हा व्हिडिओ कारखान्यातील सीसीटीव्हीत स्पष्टपणे रेकॉर्ड झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे. X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल प्लॅटफॉर्मवर @alkuran1650 या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, काही तासांतच हजारो लोकांनी त्याला लाईक आणि शेअर केलं आहे.
Powered By Sangraha 9.0