अमरावती, 
police suspended चांदूर रेल्वे येथील खुनाचे प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी अमरावती ग्रामीणच्या चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यातील आठ पोलिस कर्मचारी सोमवारी निलंबीत करण्यात आले आहे. या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली.
 
 
 
 
 
पकड वॉरंट मधील अटक आरोपीच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी अहवालानंतर चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनमधील आठ पोलिस कर्मचार्यांविरुद्ध २ नोव्हेंबर रोजी ३०२ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक यांच्या आदेशावरून सर्व ८ पोलिस अंमलदार यांना आज निलंबीत केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्यांमध्ये चांदूर रेल्वे पोलिस स्टेशन येथील राजकुमार मुलामचंद जैन, विशाल मुकुंदराव रंगारी, अश्विनी शामराव आखरे, सरिता वैद्य, प्रवीण रामदास मेश्राम, अलीम हकीम गवळी, अमोल अमृतराव घोडे, प्रशांत ढोके यांचा समावेश आहे. 
न्यायालयीन चौकशी अहवालात आरोपीच्या मृत्यूसाठी गार्ड इंचार्ज व गार्ड ड्युटीवर असलेले पोलिस अंमलदार यांना जबाबदार धरण्यात आले असून नमूद पोलिस अंमलदार यांच्याच कृत्यामुळे पोलिस दलाची जनमानसात बदनामी झाली असून, कर्मचार्यांनी अत्यंत बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणा दाखवला असल्याचा ठपका त्यांचेवर ठेवण्यात आला आहे. निलंबन कालावधीत या सर्व कर्मचार्यांचे मुख्यालय पोलिस मुख्यालय, अमरावती ग्रामीण हे राहील.police suspended त्याचप्रमाणे न्यायालयीन चौकशीत दोषी आढळलेले पोलिस निरीक्षक अजय अहिरकर तत्कालीन ठाणेदार पोलिस स्टेशन चांदूर रेल्वे यांचे विरुद्ध कारवाई करिता वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे.