धक्कादायक...५० लाख रुपये केले खर्च आणि घरी आले मृतदेहाचे फोटो

03 Nov 2025 11:30:44
दसुहा, 
donkey-route हरियाणातील कैथल जिल्ह्यातील एका तरुणाची ग्वाटेमाला येथे डंकी रूटने अमेरिकेत जाण्याच्या प्रयत्नात हत्या झाल्यानंतर आता पंजाबच्या दसूहा तालुक्यातील मोरियां गावातील २१ वर्षीय साहिब सिंग याचाही तसाच दुर्दैवी अंत झाला आहे. अमेरिकेत पोहोचण्याआधीच ग्वाटेमालातील तस्करांनी त्याची निर्घृण हत्या केली. साहिबच्या वडिलांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांनी हरियाणाच्या करनाल येथील एका एजंटमार्फत आपल्या मुलाला अमेरिकेत पाठवले होते. सुरुवातीला दोन-तीन महिने एजंट नियमितपणे मुलाशी संपर्क साधत होता, पण नंतर अचानक संवाद तुटला. काही काळानंतर एका अनोळखी व्यक्तीने व्हिडिओद्वारे माहिती दिली की साहिब सिंगचा मृत्यू झाला आहे.

donkey-route 
 
कुटुंबाने एजंटशी संपर्क साधल्यावर त्याने गोलमाल उत्तर देत वेळ काढली. अखेर साहिबच्या वडिलांनी होशियारपूर जिल्ह्यातील दसूहा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. साहिबसोबत प्रवास करणाऱ्या इतर तरुणांकडून समजले की, तस्करांनी त्याला अपहरण केले होते. एजंटकडून पैसे न मिळाल्याने त्यांनी त्याचा खून केला. साहिबला अमेरिकेत पोहोचवण्यासाठी कुटुंबाने एजंटला तब्बल ४० लाख रुपये दिले होते. साहिब हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता आणि त्याला दोन बहिणी आहेत. साहिबचा मेहुणा गुरदीप सिंग म्हणाला की, एजंटने त्यांना खात्री दिली होती की तो साहिबला सुरक्षितपणे अमेरिकेत पोहोचवेल. मात्र नंतर कळले की त्याला बेकायदेशीर डंकी रूटद्वारे पाठवले गेले होते. donkey-route प्रवासादरम्यान तस्करांनी साहिबचे अपहरण केले आणि २०,००० डॉलर्सची खंडणी मागितली. एजंटकडून ५० लाख रुपये घेतले गेले असतानाही साहिबचा जीव वाचवण्यासाठी काहीही करण्यात आले नाही. तस्करांनी मृत साहिबचे फोटो कुटुंबाला पाठवले. कुटुंबाने पोलिसात तक्रार दिली, परंतु ठोस कारवाई झाली नाही. एजंटला अटक करण्यात आली असली तरी पैसे परत मिळाले नाहीत. कुटुंबाचा आग्रह आहे की एजंटवर फसवणुकीसोबत खुनाचा गुन्हाही दाखल केला जावा. साहिबचे वडील सुच्चा सिंग हे शेतकरी असून त्यांनी सांगितले की ना भारतीय सरकारकडून ना अमेरिकन प्रशासनाकडून त्यांना कोणतीही मदत मिळाली आहे. आपल्या मुलाचे पार्थिव भारतात आणण्यासाठीही कोणत्याही देशाने सहकार्य केलेले नाही. अजूनही त्यांना मुलाचे शेवटची भेट घेता आलेली नाही. त्यांनी मागणी केली की करनालमधील एजंटविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि पंजाब तसेच केंद्र सरकारने साहिबचे पार्थिव भारतात आणण्यासाठी तातडीने मदत करावी.
याआधीही हरियाणातील कैथल जिल्ह्यातील मोहना गावातील १८ वर्षीय युवराज याची ग्वाटेमाला येथे तस्करांनी हत्या केली होती. रोजगाराच्या शोधात तो गेल्या वर्षी अमेरिकेकडे निघाला होता. donkey-route काही काळानंतर तस्करांनी त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र आणि फोटो कुटुंबाला पाठवले व ३ लाख रुपयांची मागणी केली. हरियाणातील तीन ट्रॅव्हल एजंटांनी सुरक्षित प्रवासाचे आश्वासन देत त्याच्या कुटुंबाकडून ४० ते ५० लाख रुपये घेतले होते. तक्रार दाखल केल्यानंतर दोन एजंटांना अटक करण्यात आली होती.
Powered By Sangraha 9.0