गोंदिया एसटी आगाराला लक्ष्मी पावली

03 Nov 2025 20:38:34
गोंदिया, 
lakshmi pavli at gondia दिवाळी सर्वत्र थाटात साजरी करण्यात आली असतानाच राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारानेही दणक्यात दिवाळी साजरी केली आहे. दिवाळीच्या कालावधीत १८ ते २७ ऑक्टोबरदरम्यान आगाराला महिला प्रवाशांकडून तब्बल २४ लाख ७२ हजार ५१२ रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत शासन देत असल्याने शासनाकडील एवढाच वाटा मिळणार आहे. तर या कालावधीतील एकूण उत्पन्न ९६ लाख १३ हजार ११२ रुपयांवर गेले असल्याची माहिती स्थानिक आगाराच्या सुत्रांनी दिली.
 
 

gondia st bus 
 
 
दिवाळीत महालक्ष्मीची पूजा केली जात असून, सर्व सुख-शांती तिच्या पावलांनी आपल्या घरात यावी यासाठी घरोघरी तिचे पूजन केले जाते. महिलांनाही थेट लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला असून, घरातील महिलांच्या पावलांनीच प्रत्येकाच्या घरात सुख, शांती नांदते असे म्हटले जाते. यामुळे समाजात महिलांना वेगळे स्थान आहे. आहे. महामंडळानेही याची दखल घेत महिलांना प्रवासात ५० टक्के सूट दिली असल्याने त्यांना अर्धे तिकीट आकारले जाते. दिवाळी सणात मोठ्या प्रमाणात प्रवास होतो. याच दरम्यान महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळातर्फे हंगामी भाडेवाढ केली जाते.lakshmi pavli at gondia मात्र यंदा राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी व परतीच्या पावामुळे मोठे नुकसान झाले. यामुळे यंदा शासनाने हंगामी भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेतला होता. दरवर्षी दिवाळी सणाच्या कालावधीत एसटी महामंडाला कोट्यवधीचे उत्पन्न मिळते. गोंदिया आगाराला १८ ते २७ ऑक्टोबर दरम्यान ९६ लाख १३ हजार ११२ रुपयाचे उत्पन्न मिळाले. या कालावधीत ७४ हजार पेक्षा अधिक महिलांनी एसटी बसने प्रवास केल्याने त्यांच्याद्वारे आगाराला ४ लाख ७२ हजार ५१२ रुपयाचे उत्पन्न मिळाले. या कालावधील एवढीच रक्कम शासनाकडून आगाराला प्राप्त होणार आहे.
Powered By Sangraha 9.0