बायको नंतर गर्लफ्रेंड... नग्न रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह...

03 Nov 2025 18:28:55
गुजरात,
Gujarat murder case गुजरातमधील नवसारी जिल्हा हादरवणारी दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. येथील राष्ट्रीय महामार्ग-४८ जवळ एका बंद भात गिरणीत एका महिलेचा नग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली.
 

Gujarat murder case  
पोलिसांनी आरोपी फैजल नासिर पठाणला अटक केली असून, चौकशीत त्याने एक नाही तर दोन जणांची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी गुजरातच्या बारडोली येथील रहिवासी असून, त्याची वय सुमारे २५ वर्षे आहे.चौकशीत फैजलने कबुल केले की, मृतदेह ही त्याची गर्लफ्रेंड रिया आहे. २८ ऑक्टोबर रोजी आर्थिक वादातून त्याने रियाची हत्या केली. पोलिस तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचले गेले.
तपासात समोर Gujarat murder case आले की, तीन महिन्यांपूर्वी फैजलने त्याची बायको सुहानाची हत्या देखील केली होती. आरोपीने सांगितले की, बायकोची हत्या ज्या ठिकाणी केली होती, त्याच ठिकाणी त्याने गर्लफ्रेंडची हत्या केली. भात गिरणीत बायकोचे मृतदेह लपवले होते आणि त्याच ठिकाणी रियाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले असता, बायको सुहानाच्या मृतदेहाचा सांगाडाही सापडला.दोन्ही मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. नवसारी पोलिसांनी फैजल पठाणविरोधात दुहेरी हत्याकांडाची नोंद केली असून, तपास सुरू आहे.स्थानिक पोलिसांनी सांगितले की, आरोपीची गर्लफ्रेंड कचरा वेचण्याचे काम करत होती. या हत्याकांडाने परिसरात खळबळ निर्माण केली असून, पोलिसांनी तपास वेगाने पुढे नेण्याचे आश्वासन दिले आहे.
Powered By Sangraha 9.0