गढवा,
Officer caught at home with girlfriend गढवा जिल्ह्यातील माजियांवचे प्रखंड विकास अधिकारी (सीओ) प्रमोद कुमार एका महिलेसोबत त्यांच्या सरकारी निवासात असताना त्यांची पत्नी डॉ. श्यामा राणी यांनी त्यांना रंगेहाथ पकडलं. या घटनेमुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला असून, पोलिसांनाही मध्यस्थी करावी लागली. माहितीनुसार, त्यांची पत्नी श्यामा राणी यांना माहिती मिळाली की, त्यांचे पती घरात एका महिलेसोबत आहेत. त्यानंतर त्यांनी कोणालाही न कळवता थेट सरकारी निवासस्थानाच्या भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. आत जाताच त्यांच्या डोळ्यांसमोरच पती दुसऱ्या महिलेसोबत असल्याच दृश्य आल आणि त्या संतापून गेल्या. त्यांनी तत्काळ दरवाजे बाहेरून बंद केले आणि पतीवर संताप व्यक्त करत मोठा गोंधळ घातला.
दरम्यान, शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संतापलेल्या पत्नीला कोणीही शांत करू शकलं नाही. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर सीओ प्रमोद कुमार यांनी छतावरून उडी मारण्याचा बहाणा करत आणखी गोंधळ निर्माण केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित महिलेला ताब्यात घेतलं आणि तिला महिला पोलिस ठाण्यात नेलं. ही घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली असून, सरकारी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून पुन्हा एकदा शिस्त आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.