सागर निंबोरकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

03 Nov 2025 19:00:55
गडचिरोली,
sagar nimborkar joins bjp गडचिरोली शहरातील युवा कार्यकर्ते सागर निंबोरकर यांचा सपत्नीक शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात आज प्रवेश झाला. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर भाजपला मोठी बळकटी मिळाली, असे बोलले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे गडचिरोलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
 
 

निंबाळकर  
 
 
या प्रवेश सोहळ्याला भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रमुख तथा गडचिरोली जिल्ह्याचे समन्वयक संजय फांजे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे, गीता हिंगे, गोविंद सारडा आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सागर निंबोरकर यांनी पत्नी प्रणोती निंबोरकर, राहुल नीलमवार, अंकुश मारबते, अभिजीत अंडलकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश केला.sagar nimborkar joins bjp निंबोरकर हे सामाजिक क्षेत्रात तसेच युवा वर्गात एक ओळखलेले आणि लोकप्रिय नाव असून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शहरात आणि जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. गडचिरोलीतील निंबोरकर घराणे सर्वपरिचित आणि प्रभावी घराणे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सागर निंबोरकर यांच्या पक्षप्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून हा प्रवेश आगामी नगर परिषद निवडणुकांचे राजकारण बदलणारा ठरू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0