ज्येष्ठ नागरिकांनी संघटित राहणे गरजेचे : दत्ता मेघे

03 Nov 2025 18:16:12
वर्धा, 
datta meghe आपल्या कुटुंबातील सदस्य, मुले, नातवंडे कामानिमित्त गावाबाहेर किंवा देशाबाहेर असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणीत मदतीसाठी ज्येष्ठ नागरिकच धावून येऊ शकतात. म्हणूनच, ज्येष्ठ नागरिकांनी संघटित राहणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, माजी खासदार दत्ता मेघे यांनी केले.
 
दत्ता मेघे  
 
 
सावंगी (मेघे) येथे आयोजित प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीला प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा, मनोहर पंचारिया, रमेश खडसे, दामोधर राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठांचे जीवन आनंददायी करण्यासाठी तालुका आणि गावपातळीवर ज्येष्ठ नागरिक मंडळे स्थापन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. राजू मिश्रा यांनी केले.datta meghe या मंडळांना ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानसोबत संलग्न केल्यास दैनंदिन अडीअडचणी सोडविण्यापासून तर ज्येष्ठांची सहल, मनोरंजनाचे कार्यक्रम, वैद्यकीय उपचार, शासकीय योजना अशा विविध गोष्टींचा लाभ त्यांना देता येईल, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले. बैठकीला तालुका संयोजक यशवंत होले (आष्टी), अरुणा चाफले (कारंजा), दिलीप अग्रवाल (देवळी), अमीन ओलिया (पुलगाव), प्रदीप बजाज व गीता राऊत (वर्धा), अशोक कलोडे (सेलू), डॉ. विजय पर्वत (हिंगणघाट) यांच्यासह विनोद पवार, प्रफुल बाहे, अविनाश नानोटे, रवींद्र गोसावी, विजय उगले, सिंधू गोयनका, कमलाकर सायंकार, श्याम शंभरकर, सारिका नासरे, विक्रम कुरळकर, सुनील ठाकरे, जिल्हा निरीक्षक कालिंदिनी ढुमणे, अ‍ॅड. किरण मोहिते आदींनी उपस्थित राहून आपले विचार मांडले.
Powered By Sangraha 9.0