कुलगाममध्ये दोन दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त

03 Nov 2025 11:03:22
जम्मू,
Terrorist hideouts destroyed in Kulgam जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षादलांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. कुलगाम जिल्ह्यातील दमहल हांजीपोरा परिसरातील घनदाट जंगलात दोन दहशतवादी ठिकाणे शोधून सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली आहेत. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागात काही दहशतवादी लपल्याची शक्यता होती. त्यानंतर लष्कराच्या ९व्या राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली.
 
 
 
Terrorist hideouts destroyed in Kulgam
या कारवाईदरम्यान जंगलाच्या आत दहशतवाद्यांनी तयार केलेली दोन तात्पुरती अड्डी सापडली. त्या ठिकाणांवरून सुरक्षादलांना अन्नपदार्थ, कपडे, गॅस सिलिंडर आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तू मिळाल्या. यावरून दहशतवादी या भागात काही दिवसांपासून थांबले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.
 
सुरक्षादलांनी दोन्ही अड्ड्यांवरून मिळालेली सर्व सामग्री जप्त केली असून ती नष्ट करण्यात आली आहे. त्यानंतर या परिसरात आणखी कोणी दहशतवादी लपलेले नाहीत, याची खात्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी हालचालींमध्ये वाढ झाल्याचे सुरक्षा यंत्रणांचे निरीक्षण आहे. त्यामुळे लष्कर आणि पोलिसांनी मिळून या भागात शोधमोहीमा अधिक तीव्र केल्या आहेत. या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या हालचालींना मोठा आघात बसल्याचे मानले जात आहे.
Powered By Sangraha 9.0