भाववीण कोणतीही कृती निरर्थकच

30 Nov 2025 21:41:55
नागपूर, 
govindashastri-jatdevlekar : ‘मूर्तीत भाव नसेल तर दगड आहे’, असे तुकाराम महाराज सांगतात. त्याचप्रमाणे तीर्थप्राशन करताना भाव नसेल तर ते फक्त पाणी आहे. संतसंगतीत असताना भाव महत्त्वाचा असून तरच त्या कृतीला अर्थ आहे, असे बहुमूल्य मार्गदर्शन हभप गोविंदशास्त्री जाटदेवळेकर यांनी ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातील महात्मा पदाची परिषाभा समजावून सांगताना केले.
 
 

30-nov-02 
 
 
 
सद््गुरू श्री विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्राच्या जयप्रकाशनगरातील गुरू मंदिरात दत्तजयंती उत्सावानिमित्त ‘ज्ञानेश्वरीतील महात्मा पदाची परिभाषा’ विषयावरील प्रवचनात गोविंदशास्त्री म्हणाले, चोखट अंतःकरण म्हणजे मोकळे मन. एवढे मोकळे की, शत्रू जरी आपल्याकडे आला तरी आपण जेवू घालू. ही अवस्था संतांच्या सहवासात प्राप्त होते. ज्ञानेश्वर माऊलींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जे काही सांगायचे असते ते कळसाचेच असते. जे आधी कधीच कुणी सांगितले नसते. त्यामुळे ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी हवीहवीशी वाटते, असेही गोविंदशास्त्री यांनी नमूद केले. यावेळी प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर, धर्मभास्कर सद््गुरूदास महाराज उपस्थित होते.
 
 
उद्याही घेता येईल लाभ
 
 
तीन दिवसीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प उद्या 1 डिसेंबरला गुंफले जाणार असून दुपारी चार ते साडेपाच व सायंकाळी सात ते साडेआठदरम्यान मुकुंदकाका जाटदेवळेकर व गोविंदशास्त्री जाटदेवळेकर यांच्या प्रवचनाचा लाभ घेता येईल. मंगळवारी भारुड, बुधवारी पत्रभेट ‘गाथा विजयाची’ कार्यक्रम, गुरुवारी दत्त जयंती सोहळा, शुक्रवारी महाप्रसादाने सांगता होईल.
Powered By Sangraha 9.0