मुंबई,
Mansi Naik, मराठी चित्रपटसृष्टीतील चर्चेत राहिलेला मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचा घटस्फोट पुन्हा एकदा गाजत असतानाच, प्रदीप खरेरा दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. काही महिन्यांपूर्वीच मानसी आणि प्रदीप यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रदीपच्या वैयक्तिक आयुष्यातील हालचालींबद्दल अनेक तर्क–वितर्कांना उधाण आले होते. अखेर सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या फोटों आणि व्हिडीओंमधून प्रदीपने नव्या आयुष्याची सुरुवात केल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे.
प्रदीपच्या लग्नाच्या फोटोंमध्ये तो आणि त्याची नववधू पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत. विधीवत सोहळा पार पडतानाचे क्षणही रिअल्स आणि फोटोमधून समोर आले. मंगळसूत्र घालण्याचा प्रसंग, फेरे आणि नवदांपत्याचे आनंदी चेहरे पाहून अनेकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रदीपच्या नव्या जोडीदाराचे नाव विशाखा पनवार असून तीही अभिनेत्री आहे. त्यामुळे या विवाहाने मनोरंजन क्षेत्रात विशेष उत्सुकता निर्माण केली आहे.
दुसरीकडे, प्रदीपच्या या विवाहाला मानसी नाईकची प्रतिक्रिया काय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, मानसीने अद्याप या विषयावर कोणताही प्रतिक्रिया दिली नाही. घटस्फोटानंतर ती आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत असून विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याचे सांगितले जाते. वैयक्तिक जीवनाबाबत ती सध्या शांत राहण्याचा मार्ग स्वीकारत आहे. तिचे चाहतेही मानसीने आपल्या करिअरकडे केलेल्या वळणाचा आदर करत तिच्या आगामी कामांची आतुरतेने वाट पाहत आहेत.प्रदीपच्या दुसऱ्या लग्नानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. #PardeepKhareraWedding सारखे हॅशटॅग ट्रेंड होत असून चाहते त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काहीजण प्रदीपच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देत आहेत, तर काहीजण मानसीच्या पूर्वायुष्याचा उल्लेख करत सहानुभूतीही व्यक्त करत आहेत.एकूणच, प्रदीप खरेराच्या नव्या वैवाहिक जीवनाबद्दल उत्सुकता वाढत असतानाच, दोघांच्याही आयुष्यात नवी पानं उलगडत आहेत. मनोरंजन विश्वात या घडामोडींची चर्चा काही काळ तरी थांबणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.