दिग्रस भाजपात इनकमिंगला जोरदार सुरवात

04 Nov 2025 18:03:01
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
digras-bjp : शहराध्यक्षपदासाठी 45 वर्ष वयोगटाचा भारतीय जनता पार्टीचा फॉर्म्युला दिग्रस शहरात 100 टक्के यशस्वी ठरल्याचे आता प्रत्यक्षात दिसू लागले आहे. तरुण व ऊर्जावान नेतृत्वाच्या प्रेरणेतून भाजपात ‘इनकमिंग’ची लाट सुरू झाली आहे. त्यामुळे जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
 
y4Nov-Niyojan
 
 
 
कधीकाळी दिग्रस भाजपा म्हणजे साडेतीन लोकांचा पक्ष अशी टीका करून हिणवली जाणारी भाजपा आज शेकडो कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागाने शहरात भक्कम पाय रोवत आहे. शहराध्यक्ष अभय इंगळे यांच्या नेतृत्वात 40 सदस्यांची शहर कार्यकारिणी, 40 बुथप्रमुख, 9 शक्तीप्रमुख तसेच विविध मोर्चा-आघाडींची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पक्ष संघटन सशक्त करण्याचे अभियान वेगाने सुरू आहे.
 
 
या पृष्ठभूमीवर सोमवार, 3 नोव्हेंबर रोजी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान यांच्या अध्यक्षतेत दिग्रस येथे निवडणूक नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक तरुणांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
 
 
या प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, पुसद जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गजानन निचत, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज राठोड, अल्पसंख्यक आघाडी जिल्हाध्यक्ष आतिक मौलाना, माजी तालुकाध्यक्ष सुभाष काटेकर, तालुका सरचिटणीस अरुण राठोड, शहराध्यक्ष अभय इंगळे व निवडणूक संचालन समितीचे सहसंयोजक प्रमोद बनगिनवारसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर ठाकरे, आनंद मोरे, अनिल राठोड व देवानंद लांडगे यांनी या बैठकीत पक्षप्रवेश केला. प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान यांनी पुष्पगुच्छ व पक्षाचा शेला अर्पण करून केले.
 
 
जुने आणि नवीन कार्यकर्त्यांमधील समन्वय, संघटनशक्ती व तरुणाईचा उत्साह या तिन्हींच्या एकत्रित बळावर येणाèया नगरपरिषद निवडणुकीत भाजप नक्कीच यश संपादन करणार, असा विश्वास अभय इंगळे यांनी व्यक्त केला.
राजकीय रंगत वाढली
 
 
दुसरीकडे काही राजकीय दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश सुरू असताना, भाजपमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि नव्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढल्याने येणारी नगरपरिषद निवडणूक चुरशीची ठरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Powered By Sangraha 9.0