दिग्रस येथे इंदिरा गांधी योजनांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट शिबिर

04 Nov 2025 16:43:28
यवतमाळ,
indira-gandhi-scheme :  दिग्रस नप हद्दीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग योजनेतील शहरातील लाभार्थ्यांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (डी.एल.सी.) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 

AI 
 
हे शिबिर 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नगर परिषद शाळा क्र. 8 संभाजीनगर येथे होणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी आपले डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढून घ्यावे, कारण प्रमाणपत्र केल्यानंतरच अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित लाभार्थ्यांनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मयूर राऊत यांनी केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0