नागपूर,
Kartiki Ekadashi कार्तिकी एकादशी निमित्त दुर्गा देवी मंदिर, येथे पौरोहित्य वर्ग, धंतोली यांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विष्णूसहस्त्रनामाचे आवर्तन करण्यात आले.
भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमावेळी वर्ग प्रधान, माई खांडेकर स्वतः उपस्थित होत्या.Kartiki Ekadashi या पौरोहित्य वर्गाची विशेषता म्हणजे विविध ठिकाणी स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, रुद्र आदी विविध धार्मिक सेवा देण्याची त्यांची सातत्यपूर्ण परंपरा आहे.
सौजन्य : डॉ. अचला तांबोळी,संपर्क मित्र