नागपूर,
Oscar Cultural Music Academy ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमी, नागपूर यांच्या तर्फे अलीकडेच घेण्यात आलेल्या गीतगायन स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक गटामध्ये डॉ. अरुण पांडे यांनी आपल्या सुरेल आणि भावपूर्ण गायनाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या या उत्तम सादरीकरणाबद्दल परीक्षकांनी त्यांना द्वितीय पारितोषिकाने सन्मानित केले.
डॉ. पांडे हे संगीत क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही त्यांनी सहभाग नोंदवला आहे. Oscar Cultural Music Academy त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
सौजन्य : अंजली पांडे,संपर्क मित्र