पांढरकवडा परिसरातील चार विद्यार्थी सनदीलेखापाल

04 Nov 2025 20:10:59
पांढरकवडा,
pandharkawda students CA exam पांढरकवडा शहर व परिसरातील चार विद्यार्थ्यांनी अलीकडेच जाहीर झालेल्या सनदी लेखापाल परीक्षेत यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य डहाके (केळापूर), गायत्री हेमंत चिद्दरवार (पांढरकवडा), वैभव सुनील गवळी (ताडउमरी) व हर्षदा जैणेकर (पांढरकवडा)यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. स्थानिक नागरिक व शिक्षकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

pandharkawda students CA exam 
Powered By Sangraha 9.0