'हिजाब उतारो' म्हणताच हंगामा; रुग्णाच्या नातेवाइकांचा डॉक्टर-नर्सवर हल्ला, VIDEO

04 Nov 2025 14:56:04
विदिशा, 
patients-relatives-attack-doctors-vidisha मध्य प्रदेशातील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन विभागात रविवारी संध्याकाळी (३ ऑक्टोबर) एक धक्कादायक घटना घडली. हिजाब काढण्याच्या मुद्द्यावरून महिला रुग्ण आणि डॉक्टर-स्टाफ यांच्यात झालेल्या वादानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केली आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या गोंधळामुळे आपत्कालीन विभागात काही काळ प्रचंड गोंधळ उडाला.
 
patients-relatives-attack-doctors-vidisha
 
मिळालेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय सुल्ताना बी नावाच्या मुस्लिम महिला घरी पडल्याने तिचा चेहऱ्यावर आणि शरीरावर गंभीर दुखापती झाल्या होत्या. तिला तिचे नातेवाइक फारुख आणि आठ ते दहा जणांसह वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. ड्युटीवरील डॉक्टरांनी उपचार सुरू केले आणि रक्तदाब तपासल्यानंतर चेहऱ्यावरील जखमा तपासण्यासाठी रुग्णेला हिजाब काढण्याची विनंती केली. patients-relatives-attack-doctors-vidisha मात्र, सुल्ताना बी हिने विरोध दर्शवला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला आणि रुग्णाच्या नातेवाइकांनी अचानक हल्ला चढवला. अस्पताल प्रशासनाने सांगितले की, नातेवाइकांनी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफवर शिवीगाळ व मारहाण केली. त्यांनी औषधांच्या ट्रॉली उलथवून दिल्या, इंजेक्शन आणि उपकरणे फोडली तसेच दरवाज्याचेही नुकसान केले. या घटनेत एक डॉक्टर आणि तीन नर्स जखमी झाले. हल्ल्यामुळे इतर रुग्णांच्या उपचारांवरही परिणाम झाला. या घटनेनंतर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. नगर पोलिस अधीक्षक अतुल सिंह यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे आरोपी नातेवाइकांविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
सौजन्य : सोशल मीडिया 
दुसरीकडे, सुल्ताना बी हिने मात्र डॉक्टरांवर वाईट वागणुकीचा आरोप केला आहे. त्यांनी तिने सांगितले की, “डॉक्टरांनी माझ्याशी उद्धटपणे वागले आणि बाहेरून औषध आणण्यास सांगितले, त्यामुळे वाद झाला.” तर डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचा दावा आहे की, “उपचारादरम्यान आम्ही फक्त चेहऱ्यावरील जखमा पाहण्यासाठी हिजाब काढण्याची विनंती केली होती. patients-relatives-attack-doctors-vidisha मात्र, नातेवाइकांनी त्यावरून मारहाण सुरू केली.” घटनेनंतर हंगामा करणाऱ्यांपैकी काहीजणही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आले. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
Powered By Sangraha 9.0