पिंटू शिर्के हत्याकांडातून कुख्यात राजू भद्रे निर्दाेष मुक्त

04 Nov 2025 11:24:17
नागपूर,
Pintu Shirke Murder Case न्यायालयात सुनावणी दरम्यान हजर करण्यात आलेल्या पिंटू शिर्केवर कुख्यात गुन्हेगारांनी हल्ला करीत ठार केले हाेते. न्यायालयातच हत्याकांड घडल्यामुळे हे प्रकरण राज्यभरात गाजले हाेते. या हत्याकांडातील मुख्य आराेपी कुख्यात गुन्हेगार राजू भद्रे याला सर्वाेच्च न्यायालयाने साेमवारी या हत्याकांड प्रकरणातून निर्दाेष मुक्त केले आहे. पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वाेच्च न्यायालयाने हा निकाल देत भद्रेची शिक्षा रद्द करून त्याला सर्व आराेपांमधून मुक्त केले. गेल्या 23 वर्षांपूर्वी घडलेल्या पिंटू शिर्के हत्याकांडाला या निर्णयामुळे पुन्हा उजाळा मिळाला, हे विशेष.
 
 
Pintu Shirke Murder Case
 
पिंटू शिर्के हत्याकांडात सर्वाेच्च न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब, पुरावे आणि प्रक्रियात्मक नाेंदींची सखाेल तपासणी केल्यानंतर निष्कर्ष काढला की, अभियाेजन पक्ष भद्रेचा दाेष संशयापलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. परिणामी न्यायालयाने त्याची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. राजू भद्रे यांच्या वतीने वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांच्यासह अ‍ॅड. प्रुल्ल माेहगावकर आणि अ‍ॅड. शुभंकर डबले यांनी युक्तिवाद केला. बचाव पक्षाने साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती, ाॅरेन्सिक पुराव्यांचा अभाव आणि तपासादरम्यान झालेल्या त्रुटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने हे युक्तिवाद ग्राह्य धरत शिक्षा कायम ठेवण्यासारखी नसल्याचे निरीक्षण नाेंदवले.
 
 
असे घडले पिंटू शिर्के हत्याकांड
11 ेब्रुवारी 2002 राेजी सत्र न्यायालयाच्या परिसरात स्वप्नील उफर् पिंटू शिर्के यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आणि न्यायालयीन सुरक्षेतील गंभीर त्रुटी समाेर आल्या. तपासात ही हत्या जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित वादातून घडल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात सात जणांवर गुन्हे दाखल झाले. ज्यामध्ये राजू भद्रे आणि माजी नगरसेवक विजय मते मुख्य आराेपी हाेते. हे हत्याकांड राज्यभर गाजले हाेते.
 
 
पिंटूच्या आईचा संघर्ष
सामाजिक आणि राजकीय दबावाला झुगारून मृत स्वप्नीलच्या आईने यांनी तब्बल दाेन दशके न्याय मिळवण्यासाठी संघर्ष केला. 2013 मध्ये सत्र न्यायालयाने राजू भद्रे यांच्यासह काही आराेपींना खून, गुन्हेगारी कट आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे दाेषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर 22 जून 2015 राेजी उच्च न्यायालयाने 12 आराेपींच्या शिक्षेला दुजाेरा देत 4 जणांची निर्दाेष सुटका केली. त्यानंतर 10 ऑक्टाेबर 2017 राेजी सर्वाेच्च न्यायालयाने सात आराेपींच्या जन्मठेपेच्या शिक्षेला मान्यता दिली, ज्यात राजू भद्रे आणि विजय मते यांचा समावेश हाेता. अखेर 2025 मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने पूनर्विचार याचिकेचा निकाल देताना भद्रे याला सर्व आराेपांमधून निर्दाेष मुक्त केले.
Powered By Sangraha 9.0