नागपूर,
Ramnagar Nagpur तरुण भारतच्या शताब्दीनिमित्त आयोजित तुलसीविवाह या उपक्रमात रामनगर येथील श्रीराम मंदिर परिसरात तुलसीविवाह सोत्साह संपन्न झाला.शंतनू गुरुजींनी शास्त्रोक्त पद्धतीने विवाहविधी पार पाडले, तर आदित्य काळेले यांनी संपत्नीक देवक धरले. मंगलाष्टकांचे स्वर, वादन-नर्तन आणि आतषबाजीने वातावरण भारावले.
या प्रसंगी अध्यक्ष रवी वाघमारे, सचिव राजीव काळेले, तसेच श्रीराम सावरकर, दीपक खीरवडकर, विनोद जोशी, मृणाल पुराणिक, हेमांगी अभ्यंकर, Ramnagar Nagpur अशोक आग्रे, जयंत आपटे यांसह असंख्य भक्त उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी तरुण भारतने दिलेल्या तुलसीविवाह किटबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सौजन्य:रवि वाघमारे,संपर्क मित्र