गडचिरोली शहरात रिंग रोडचे आश्‍वासन अद्याप अपूर्ण

04 Nov 2025 18:36:11
गडचिरोली, 
Ring road in Gadchiroli city गडचिरोली शहरातील वाढत्या अपघातांच्या पृष्ठभूमीवर रिंग रोडची आवश्यकता असल्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वधानसभा संघटक नंदु कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा जिल्हा अधिकारी पवन गेडाम यांच्या नेतृत्वात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर थेट निशाणा साधत गडकरी यांनी दिलेले रिंग रोडचे आश्‍वासन आजही अपूर्ण आहे, असा आरोप केला आहे. शिवसेना पक्षाचे युवासेना जिल्हा अधिकारी पवन गेडाम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आठ वर्षांपूर्वी नितीन गडकरी यांनी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयात झालेल्या सभेमध्ये गडचिरोली शहरासाठी रिंग रोड उभारण्याचे सार्वजनिक आश्‍वासन दिले होते. त्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून गडचिरोलीकरांनी भाजपाच्या उमेदवाराला मत दिले आणि त्यांना निवडून दिले. मात्र, आजपर्यंत त्या रिंग रोडचे काम सुरू झालेले नाही.
 
 
Ring road in Gadchiroli city
 
युवा सेनेतर्फे या संदर्भात अनेक निवेदने संबंधित विभागांना सादर करण्यात आली, तरीदेखील त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पही अर्धवट अवस्थेत थांबले असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, रुग्ण व वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गेडाम यांनी पुढे म्हटले, निवडणुकांच्या पृष्टभूमीवर मोठमोठी आश्‍वासने देऊन जनतेची दिशाभूल केली जाते. आठ वर्षे उलटून गेली, दोन निवडणुका संपल्या आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत तरी रिंग रोडचे काम केवळ कागदावरच आहे. गडचिरोलीकरांनी आता ‘आश्‍वासन नव्हे, कृती’ अशी मागणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. नवीन आश्‍वासने देण्याऐवजी जुनी पूर्ण करावी आणि गडचिरोली रिंग रोडच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात करावी. अशीही मागणी गेडाम यांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे निवचेदनातून केली आहे. यावेळी युवासेना उपतालुका अधिकारी चेतन उरकुळे, युवासेना उपतालुका अधिकारी अतुल नैताम उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0