रोटरी क्लब ऑफ मिडटाउनतर्फे जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा

04 Nov 2025 18:13:15
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Badminton Tournament : नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे दोन दिवस विविध गटामध्ये सर्व खेळाडूकरिता बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील खडसे व यवतमाळ जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष शशांक देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली.
 
 
 
k o
 
 
 
स्पर्धेच्या विजेत्याला 5 हजार 100 रुपये रोख व चषक, उपविजेत्याला 3 हजार 100 रुपये रोख व चषक ठेवण्यात आले. विजेत्यांना सुनील खडसे, शशांक देशमुख, तहसीलदार योगेश देशमुख, किशोर जाजू, चारुदत्त जावरकर, निलेश धुमे, प्रदीप गाबडा, जाफर गिलानी, राजेश गडीकर, कौस्तुभ भुरचंडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
 
 
75 प्लस गटात विजेता चेतन राठी, रोचित जोतवानी, उपविजेता सचिन डकरे, शुभम नाकतोडे. 90 प्लस गटात विजेता सोहन राठी, सचिन डकरे, उपविजेता निखिल अंदुरकर संजय मुंदडा. खुल्या गटात विजेता सचिन पवार, विकास जिजोरे, उपविजेता मानस गाबडा, अथर्व उमरतकर यांनी स्पर्धेत यश प्राप्त केले.
 
 
मिश्रगटात विजेता पंकज सरोदे, अंकित अंदुरकर, उपविजेता रोचित जोतवानी, मधुरा फेंडर यांनी यश प्राप्त केले. चेतन मगर व अबीर रानडे यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले.
 
 
जनसंपर्कप्रमुख ब्रिजमोहन राठी, जगजीतसिंग ऑबेराय, परेश लाठीवाला, घनश्याम बागडी, गोपाल अग्रवाल, अमित मोर, जयप्रकाश जाजू, डॉ. संजीव जोशी, संजय लोहाना, यवतमाळ जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे बापू देशमुख, सचिन डकरे, सोहन राठी, विजय काप्रतवार, सुनील भुसार, गणेश तेलेवार, संजय मुंधडा, मानस गाबडा यांनी स्पर्धेसाठी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0