२०२६ मध्ये या ३ राशींवर राहणार शनीचा कोप!

04 Nov 2025 16:08:20
Saturn's on 3 zodiac signs २०२६ मध्ये शनीच्या साडेसातीचा प्रखर प्रभाव दिसणार आहे. या काळात काही राशींवर जबर परिणाम जाणवेल, तर काहींना थोडा दिलासा मिळेल. शनि हा कर्माचा न्यायाधीश मानला जातो आणि त्याचा प्रभाव व्यक्तीच्या आयुष्यावर दीर्घकाळ राहतो. शनीचा प्रवास अत्यंत मंदगतीने होत असल्याने, तो प्रत्येक राशीत सुमारे अडीच वर्षे थांबतो. त्यामुळे त्याच्या राशीबदलामुळे अनेकांच्या जीवनात नवीन टप्पा सुरू होतो.
 
 

Saturn 
२०२५ मध्ये शनीने कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश केला आहे. या बदलामुळे मेष राशीवर साडेसतीचा पहिला टप्पा, मीन राशीवर दुसरा आणि कुंभ राशीवर तिसरा टप्पा प्रभावी झाला आहे. हे तीनही टप्पे २०२७ पर्यंत टिकणार आहेत. त्यामुळे येत्या २०२६ मध्ये या तिन्ही राशींच्या व्यक्तींना शनीचा प्रभाव पूर्ण ताकदीने जाणवेल. याशिवाय, सिंह आणि धनु राशींवर शनीचा ‘ढैय्या’ अर्थात अर्धा प्रभाव राहणार आहे, जो देखील काही प्रमाणात आव्हानात्मक असेल.
 
 
या काळात या राशींच्या लोकांना कामात अडथळे, मानसिक ताण, आरोग्याशी संबंधित समस्या किंवा कौटुंबिक मतभेदांचा सामना करावा लागू शकतो. मात्र, योग्य आचरण आणि श्रद्धेने या परिणामांना कमी करता येते. ज्योतिषांनुसार, शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी नियमितपणे शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करावे. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दीप प्रज्वलित करावा आणि शनी चालीसाचे पठण करावे. यामुळे नकारात्मकता कमी होते आणि मानसिक शांती मिळते. याशिवाय, काळ्या वस्त्रांचे, काळ्या तीळांचे किंवा लोखंडी वस्तूंचे दान केल्याने शनी प्रसन्न होतो, असे मानले जाते. शनिदेवांच्या उपासनेसह भगवान हनुमान आणि भगवान शिवाचीही पूजा या काळात लाभदायक ठरते. शनिवारी आणि मंगळवारी हनुमान चालीसा वाचन केल्याने अडथळे कमी होतात, असेही धार्मिक मान्यता सांगते.
 
 
अनेक तज्ज्ञांचा विश्वास आहे की काळ्या गायीला चारा घालणे, तिची सेवा करणे आणि शनीच्या नावाने दान करणे यामुळे साडेसतीचा परिणाम कमी होतो. तथापि, या सर्व उपायांकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. शनी हा केवळ दंड देणारा नव्हे, तर योग्य कर्म करणाऱ्यांना यश देणारा ग्रह आहे. त्यामुळे या काळात संयम, प्रामाणिकपणा आणि सतत प्रयत्नशील राहणे हेच सर्वात प्रभावी ‘उपाय’ मानले गेले आहेत.
 
 
टीप- वरील बातमी केवळ वाचकांची आवड लक्षात घेऊन देण्यात येत आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.
 
 
Powered By Sangraha 9.0