ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेक गंभीर

04 Nov 2025 21:37:38
समुद्रपूर, 
truck-hits-two-wheeler-father नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील कोल्ही शिवारात ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील बाप-लेक गंभीर जखमी झाले. या प्रकरणी समुद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
truck-hits-two-wheeler-father
 
मिळालेल्या माहितीनुसार, मोहगाव येथील सतीश सातपुते (५५) व त्यांचा मुलगा रूपेश (२४) हे दोघे त्यांचे नातेवाईक पंकज सातपुते यांची एम. एच. ३२ एस. २३२१ क्रमांकाची दुचाकीने हिंगणघाटला जात होते. कोल्ही शिवारात विरुद्ध दिशेने येणार्‍या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात सतीश व रुपेश हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात त्यानंतर सेवाग्रामला हलविले. प्रकृती गंभीर असल्याने नंतर नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. truck-hits-two-wheeler-father दोघांवर उपचार सुरू असून या अपघातात सतीश सातपुते यांचा एक पाय निकामी झाला. पंकज सातपुते यांच्या तक्रारीवरून समुद्रपूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0