उमरखेड-महागाव तालुक्यातील 30 गावांची ‘आदर्श विकास’

04 Nov 2025 20:06:18
तभा वृत्तसेवा उमरखेड,
umarkhed mahagaon taluka उमरखेड विधानसभेअंतर्गत 246 गावांपैकी 30 गावे ‘आदर्श विकास योजना’ अंतर्गत निवडण्यात आली असून केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून प्रतिगाव 266 विकासकामे राबविण्यात येणार आहेत. या योजनेत पांदण रस्ते, सिंचन व्यवस्था आणि रेशीम शेतीला प्राधान्य दिले जाणार आहे.
 
 

umarkhed mahagaon taluka 
ही योजना कोणत्याही वैयक्तिक लाभासाठी नसून, शेतकरी आणि नागरी सुविधा उन्नतीसाठी पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार किसन वानखेडे यांनी दिली. बैठकीला महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आयुक्त डॉ. भारत बास्टेवाड, उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुमित विहरे, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार राजेश सुरडकर, गटविकास अधिकारी किरण कोळपे, तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते तसेच माजी आमदार विजय खडसेसह अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगाव, मरसूळ, तरोडा, चातारी, मेट, सोईट, बिटरगाव, जेवली, दराटी, मुळावा, भाम्बरखेडा, वानेगाव पार्डी (ब), सुकळी, नागेशवाडी यांसह महागाव तालुक्यातील 15 गावांचा या योजनेत समावेश आहे.
योजनेतील umarkhed mahagaon taluka प्रगतीचा अहवाल प्रत्येक पंधरवड्याला संबंधित कर्मचाèयांनी तहसीलदारांकडे सादर करणे बंधनकारक राहणार असून, कामात निष्काळजीपणा करणाèयांवर कारवाई तर प्रगती दर्शविणाèयांना वेतनवाढ व प्रमाणपत्राद्वारे गौरविण्यात येईल, असे आयुक्त बास्टेवाड यांनी स्पष्ट केले.आदर्श 30 गावांचा सर्वांगीण विकास एका वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, या योजनेतून ग्रामीण भागात शाश्वत विकासाची नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली
Powered By Sangraha 9.0