नागपूर,
Vaidarbhya Car Blacksmith Federation वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ, नागपूरची त्रैवार्षिक निवडणूक रविवार, २ नोव्हेंबरला अध्यापक भवन, गणेशपेठ येथे पार पडली. ॲड. सौरभ राऊत यांच्या देखरेखीखाली लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया झाली.
एकूण ३७ उमेदवार २९ पदांसाठी रिंगणात होते. त्यापैकी २१ उमेदवार अविरोध निवडून आले, तर ८ पदांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. अध्यक्षपदी मधूकर शेंडे, उपाध्यक्षप्रमोद मेश्राम, Vaidarbhya Car Blacksmith Federation आणि युवाध्यक्ष . उत्तम शेंडे हे अविरोध निवडून आले.या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने ९९ टक्के विजय मिळवून महासंघावर वर्चस्व प्रस्थापित केले. लवकरच नव्या कार्यकारिणीची बैठक घेऊन पुढील कामकाजास प्रारंभ होणार आहे.
सौजन्य:उज्वल रोकडे,संपर्क मित्र