इस्लामच्या पवित्र स्थळी हिंसा...सौदी पोलिसांची महिलेला मारहाण, VIDEO

04 Nov 2025 14:40:10
मक्का, 
saudi-police-beat-woman उमराह दरम्यान मस्जिद अल हरम परिसरात सौदी पोलिसाने एका महिलेला आणि इजिप्शियन नागरिकाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेने केवळ इस्लामिक जगतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यात्रेकरूंवरील वागणूक आणि पवित्र स्थळांवरील मानवी सन्मानाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 

saudi-police-beat-woman 
५९ सेकंदांच्या या व्हिडिओत सौदी सुरक्षा दलाचे काही सदस्य पुरुष आणि महिला यात्रेकरूंना अत्यंत उद्धटपणे हाताळताना दिसत आहेत. हे सर्व यात्रेकरू ‘इहराम’ परिधान करून मस्जिद अल हरम परिसरात होते. saudi-police-beat-woman व्हिडिओ प्रसिद्ध होताच मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी पवित्र स्थळी अशा प्रकारच्या हिंसक वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. नेटिझन्सनी या कृतीला इस्लामच्या दयाळूपणा आणि सन्मानाच्या मूल्यांविरोधात ठरवत, अशा घटना वारंवार होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सौदी अधिकाऱ्यांना मानवीय आणि आदरयुक्त वर्तनाचे नियम कडकपणे अंमलात आणण्याची मागणी केली आहे, विशेषतः परदेशी यात्रेकरूंशी संबंधित प्रसंगी.
 
सौजन्य : सोशल मीडिया 
दरम्यान, ‘स्पेशल फोर्सेस फॉर हज अँड उमराह सिक्युरिटी’ने या प्रकरणाची दखल घेतली असून, संबंधित आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केल्याचे सांगितले आहे. प्रशासनाने म्हटले आहे की, “ग्रँड मॉस्कमध्ये लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर आवश्यक कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यात आली आहे.” याआधी २९ मार्च रोजी मदीनेतील पैगंबरांच्या मशिदीत एका महिलेनं सौदी सुरक्षा अधिकाऱ्याला थप्पड मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या वेळीही अधिकाऱ्याने प्रत्युत्तरादाखल मारहाण केली होती. saudi-police-beat-woman चौकशीनंतर हे स्पष्ट झाले की, महिलेने अनधिकृत मार्गाने मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. सौदी जनरल डायरेक्टरेट ऑफ पब्लिक सिक्युरिटीने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, पवित्र स्थळांवर कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार नाही.
Powered By Sangraha 9.0